लढवय्या महिलांच्या जिद्दीला सलाम. By- Nilesh Konde-Deshmukh
'अलिसीया मोंटानो' ह्या महिलेने इतिहास घडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'साडेआठ महिने' प्रेग्नन्ट असलेल्या या अमेरिकन धावपटूने 800मी ची शर्यत 2 मिनिटे आणि 32.13 सेकंदात पूर्ण केली. पाच वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली अलीसिया ह्या शर्यतीत तिच्या वैयक्तिक सर्वोच्च (मोनॅको) रेकॉर्ड पेक्षा फक्त 35 सेकंद हळू धावली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, "प्रेग्नन्ट असताना मी पहिल्या महिन्यापासून धावण्याचा सराव करते आहे. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम फार महत्वाचा असतो. मला धावताना मजा वाटते. फिटनेस वाटतो. त्यामुळे चौतीस आठवडे प्रेग्नन्ट असूनही मला विशेष त्रास झाला नाही. ह्याही वेळी मजाच आली." स्पर्धेत ती बाकीच्या स्पर्धकांच्या मागे पडली नाही. पहिल्या लॅपपासूनच ती वेगाने धावत होती. तिने पहिला लॅप पूर्ण केल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्या पडू लागल्या आणि तिने शर्यत पूर्ण करेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. हे सर्व अलीसियाने अगदी विचारपूर्वक केलं. ती माध्यमांना सांगते, "मला आधी काळजी वाटत होती. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले की मी ही स्पर्धा धावू शकेल. डॉक्टरांनी मला थांबवलं नाही, उलट स्प...