उर्जा दूषित कुठे आणि कशातुन होते. By-Nilesh Konde-Deshmukh

 


आपली ऊर्जा दूषित कुठे आणि कशी कशातून होते ! १] दृष्टीने २] स्पर्शाने ३]श्रवणाने ४]अन्नातून ५] दूषित जागेतून ६] पाण्यातून ७] वाणी ८] श्वासामार्फत !

 १] दृष्टी  ः-   आपण जे काही चांगले वाईट पाहतो ते आपली ऊर्जा ग्रहण करते आणि जे जे काही पाहीले आहे ते संग्रहित करते ! त्यातील जे आवश्यक आहे ते कार्यात येऊन कार्यांवित होते परंतु जे अनावश्यक आहे आणि जे संग्रहित आहे ते पुन्हा पुन्हा दृष्टी पटलावर येऊन आपल्या मनाची स्थिती बिघवते ! ध्यान साधनेत अडथळा निर्माण करते ! विचार दूषित करते ! या सर्व आठवणी मिटवण्यासाठी पुन्हा आपली ऊर्जा वेळ खर्च होते !

           

२] स्पर्श ः- आपण ज्या ज्या वस्तु व्यक्तिना फळ फुल झाडे वेलीना स्पर्श करतो त्यातील सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्या कळत नकळत ग्रहण होते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होतो ! उदाः- आपल्या लहान पणी वापरलेली एकादी वस्तू सायकल च घेऊ त्याला आपण स्पर्श केला की त्याच्या बरोबर असलेल्या चांगल्या वाईट आठवणी लगेच ताज्या होतात आणि त्या आठवणी आपल्यावर चांगला वाईट परिणाम करतात ! तसेच एखाद्या व्यक्तिला स्पर्श झाला त्यावेळेस त्याच्या शरीरात वाहणाऱ्या चांगल्या वाईट स्पदंन लहरी आपल्या संपर्कात येतात आणि आपल्यावर परिणाम करतात ! त्या व्यक्तिमध्ये वासना क्रोध अहंकार जास्त असेल तर आपल्याही त्या विकारांमध्ये वाढ होते लगेचच ते कार्यांवित व्होयला सुरुवात होते  ! आपण आशा व्यक्तिंशी संपर्क आला की चेष्टेने म्हणतो कुठे भांडण करुन आला की काय !

 

            ३] श्रवण ः- आपण जे जे ऐकतो ते ते ग्रहण करतो ! चांगले संगीत श्लोक ऐकले तर त्याचा आपल्यावर चांगला परिणाम होतो आपणाला ते आनंद उत्साह देतात ! परंतु कुठे भांडण चालले असेल किवा वाईट काही तरी कानावर पडत असेल तर कधी आपले डोके दुखते तर कधी आपणही त्याला दोन फटके मारावे अशी ईच्छा होते ! सत्संग उपदेश  ऐकून आपण ही त्या त्या परिस्थित्तीशी एकरुप होऊन नवीन सकारात्मक  दिशा ठरवतो !

 

       ४] अन्न ः- हे सर्वाना माहीती आहे अन्न बनवताना जे भाव विचार अन्न बनवणारया गृहणीच्या मनात चालू आहेत तेच सर्व त्या अन्नात उतरतात परिणामी ते अन्न ग्रहण करणारया व्यक्तिच्याही देहात मनात प्रवेश करतात ! तसेच अन्न ग्रहण करत असताना अन्न ग्रहण करत असणाऱ्या व्यक्तिच्या मनात जे विचार सुरु आहेत किवा त्याचा जो भाव आहे तो अन्नाद्वारे देहात मनात प्रवेश करतो ! तसेच अन्न ग्रहण करत असताना आजुबाजुला जे वातावरण आहे जी परिस्थिती आहे त्याचाही परिणाम होतो ! अन्न तिखट असेल तर लगेच आपणाला क्रोध येतो आळणी असेल तर निराशा छान अन्न असेल तर आनंद आणि प्रसन्नता देते !


             ५ ] दूषित जागा ः- जिथे आपण राहतो जिथे आपण बसतो जिथे आपण काम करतो जिथे आपण आपली साधना करतो ! त्या त्या वेळेस तेथील जागेतील सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्यावर परिणाम करते ! देवघरात देवळात गेले तर प्रसन्नता ऊर्जामय वाटते ! स्वंयपाक घरात गेले तर काही तरी खाण्याची ईच्छा होते ! बेडरुम गेल्यावर झोपण्याची आराम करण्याची ईच्छा होते ! एखाद्या जागेत नकारात्मक ऊर्जाचा वावर असेल तिथे नकारात्मक ऊर्जेचे बस्तान असेल तर अशा जागेत केलेले कार्य लवकर यशस्वी होत नाही खुप अडथळे येतात अपयशच पदरी येते ! नुकसानच होत जाते !  आणि सकारात्मक ऊर्जा जिथे असेल तिथे यश प्रगती प्राप्त होते !

 

        ६ ] पाणी ः- जे जे पेय बनवले जातात चहा कोल्ड्रींक यामध्ये वापर असलेले केमिकल्स तयार करत आसतानाचे भाव स्वार्थ ईर्षा फसवणूक हे सर्व भाव  आपल्यामध्ये उतरतात !

     तसेच गुलाबजल गंगाजल गोमुत्र याद्वारे वास्तूचे देहाचे वस्तूंचे घराचे जागेचे शुद्धिकरण होते त्याचा सकारात्मक परिणाम होतो !


           ७] वाणी ः-  वाणी नेहमी शुद्ध सयमी असावी आपण आरे केले तर समोरचाही कारे करणारच आहे ! आपले भाव विकार वाणीद्वारे व्यक्त होत असतात आणि ते आपल्यावर आणि इतरांवर परिणाम करत असतात ! जसे आपले भाव वाणी तसेच इतरांकडूनही आपल्याला प्राप्त होते ! ज्याकडे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात आहे त्याचा त्याच्या वाणीवर ताबा नसतो त्रयाला सय्यम नसतो वाणीला दिशा नसते ! वाणीवर ताबा म्हणजेच मौनाकडे वाटचाल ! वाणीद्वारे आपले विचार व्यक्त होत असतात आणि त्यानुसार समाजामध्ये आपली पत प्रतिष्ठा निर्माण होत असते !


         चांगल  मोजक शुद्ध वाणीने प्रेम आनंद प्रतिष्ठा निर्माण करते ! जे आपण व्यक्त करु तेच पुन्हा आपणाला प्राप्त होते हे लक्ष्यात असू द्या !

 

          ८ ] श्वास ः-  श्वास एक अत्यंत महत्वपुर्ण घटक आहे ! श्वासामार्फत ग्रहण होणारी सकारात्मक नकारात्मक ऊर्जा थेट सुक्ष्म शरीरावर परिणाम करते ! आपल्या मनात चालणारे विचार कल्पना ज्या व्यक्त झाल्या नाही ते आपल्या श्वासामार्फत व्यक्त होतात तसेच मनात असलेले भाव विकार जे व्यक्त झाले नाही ते श्वासामार्फत व्यक्त होतात ! त्याचा निचरा झालातर ठिक नाही तर पुन्हा ते श्वासामार्फत ग्रहण होतात आणि खोल परिणाम करतात !


          स्वर विज्ञानाचा ज्याचा आभ्यास आहे त्यावर नियंत्रण असते तो सकारात्मक ऊर्जाच ग्रहण करतो आणि जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकतो ! तसेच आपण इतरांच्या मनातील गोष्टी श्वासामार्फत जाणू शकतो !

 

           श्वास जेवढा शुद्ध तेवढी ऊर्जा शुद्ध श्वास जेवढा नियंत्रित तेवढी ऊर्जावर प्रभुत्व !

 

ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी विचार शुद्ध ठेवा आचार शुद्ध ठेवा व्यवहार शुद्ध ठेवा !नमन आदेश ! 


संकलन / लेखन : ह भ प निलेश महाराज कोंडे-देशमुख आळंदीकर
मो.नं.९८९००१३५२०


Published from Blogger Prime Android App



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh