लढवय्या महिलांच्या जिद्दीला सलाम. By- Nilesh Konde-Deshmukh

 



'अलिसीया मोंटानो' ह्या महिलेने इतिहास घडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
'साडेआठ महिने' प्रेग्नन्ट असलेल्या या अमेरिकन धावपटूने 800मी ची शर्यत 2 मिनिटे आणि 32.13 सेकंदात पूर्ण केली. पाच वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली अलीसिया ह्या शर्यतीत तिच्या वैयक्तिक सर्वोच्च (मोनॅको) रेकॉर्ड पेक्षा फक्त 35 सेकंद हळू धावली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, "प्रेग्नन्ट असताना मी पहिल्या महिन्यापासून धावण्याचा सराव करते आहे. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम फार महत्वाचा असतो. मला धावताना मजा वाटते. फिटनेस वाटतो. त्यामुळे चौतीस आठवडे प्रेग्नन्ट असूनही मला विशेष त्रास झाला नाही. ह्याही वेळी मजाच आली."

स्पर्धेत ती बाकीच्या स्पर्धकांच्या मागे पडली नाही. पहिल्या लॅपपासूनच ती वेगाने धावत होती. तिने पहिला लॅप पूर्ण केल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्या पडू लागल्या आणि तिने शर्यत पूर्ण करेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. 

हे सर्व अलीसियाने अगदी विचारपूर्वक केलं. ती माध्यमांना सांगते, "मला आधी काळजी वाटत होती. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले की मी ही स्पर्धा धावू शकेल. डॉक्टरांनी मला थांबवलं नाही, उलट स्पर्धेत धावायला प्रोत्साहन दिलं. तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला आणि मी स्पर्धेत धावायचा निर्णय घेतला. धावताना सर्वकाही नॉर्मलच होतं. अगदी नेहमीसारखं. फक्त मी प्रेग्नन्ट होते."

अलीसियाने स्त्रियांना कसलीच मर्यादा नसते हे दाखवून दिलं. तिच्या आत्मविश्वासातून नवीन पिढीला खूप काही शिकण्यासारखं आहे.❤️

संकलन : वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो.नं.९८९००१३५२०



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh