जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.
जपमाळ माहिती ========== जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. जप करण्याची पद्धत ————————— शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने केलेला जप : उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते. अंगठयाच्या सहाय्याने जप : मोक्ष प्राप्ती होते. तर्जनीने जप : शत्रुनाश होतो. मध्यमेने जप : धनप्राप्ती होते. अनामिकेने जप : शांतीप्राप्त होते. करांगुलीने जप : सुंदरताप्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत : मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे , या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा