जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh
जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh. 📚 भिकाऱ्यात पण माणूसपण दिसायला लागते. 📚 चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 📚 प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो. 📚 एखाद्याची चूक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. 📚 कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलू नये हे कळते. 📚 चाकू, बंदुक यांच्या पेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते. 📚 आई वडीलांची किंमत कळायला लागते. 📚 ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण, या गोष्टी म्हणजे पूर्ण जीवन संपले हा गैरसमज दूर होतो. 📚 या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात. 📚 प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते. 📚 सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते. 📚 कलाकार चित्रपटात नि नाटकात काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खूप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते. 📚 या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत. राहिलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत. काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट ह...