कर्म सिद्धांत. By-Nilesh Konde-Deshmukh
#कर्माचा_सिद्धांत कोणाची ही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परीनाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, .... अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ... जसे की शारिरीक, मानसिक, आर्थिक,..... अपमानास्पद वागणुक,... कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, ..... कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,..... छळ केलेला असेल, शारिरीक दुखापत केलेली असेल, ....... किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ...... त्रासाचे कुठलेही कारण असो... वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो, जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग ...