मागणीचे डिपॉजीट
*👏🏻देवाकडे काय मागावं👏🏻* तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते... ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असंत... आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या... पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत... अशी अकरा वर्षे गेली. बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना. ती आपल्या पतीला म्हणाली की... "जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच." बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!! ते म्हणाले... " मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही" कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले.. तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!! यात्रतेतली बांगड्याची, खेळण्य...