पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चिंतन. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
 🙏🌹!!••चिं•त•न••!!🌹🙏 🌹मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही...!!! 🌹परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो...!!! 🌹आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे...!!! 🌹पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते. आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे निवांत चिंतन करीत बसावे...!!! 🌹आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्तीला पाठवतो...!!! 🌹मनोमन देवाचे आभार मानावे

मनाचे दार उघडावे आणि दुःख वेशीवर टांगावे. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  —————————————- नैराश्यातून, तणावातून बाहेर पडण्यासाठी काय करावे? ——————————————- सोप्या शब्दात सांगायचे तर आपल्या भावना –  दुःख, तणाव, एकटेपणा, भीती आत दाबून ठेवायच्या नाहीत. कुणाला तरी भड़ाभड़ा सांगून मोकळे व्हायचे. समवयस्क व्यक्ती असेल तर ती तुम्हाला समजून घेऊ शकेल. तसेच वयाने मोठी व्यक्ती असेल तर अनुभवाचे दोन शब्द सांगून समजूत घालेल. नैराश्य या गोष्टीला वयाचे, लिंगाचे, आर्थिक स्थितीचे किंवा सामाजिक प्रतिष्ठेचे सोयरसुतक नाही. किंबहुना, प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी नैराश्यातून जावे लागते. नैराश्यात माणसाला अगदी लहान काम पण अवघड, अशक्यप्राय वाटू लागते, एरवी किरकोळ असणार्‍या गोष्टींचा पण प्रचंड तणाव येतो. ह्याला कारण म्हणजे आपल्या मनाची अवस्था अत्यंत कमकुवत झालेली असते. मग आपण ती गोष्ट न करण्याचे कारण शोधतो आणि स्वतः ची समजूत घालतो. नंतर असे वागायची सवय लागते आणि वर्षानुवर्षे नैराश्यात जातात. यावर उपाय म्हणजे, मनात असे नकारात्मक विचार यायला लागले की लगेचच त्याला आवरायचे, दोन शहाणपणाचे शब्द सांगायचे आणि अगदीच ऐकेना तर जबरदस्तीने सकारात्मक वागायला लावायचे. सवय लागली की आपोआप ताळ्यावर

श्री कृष्णांचे हे गुण तुमचे जीवन सुखी बनवु शकते. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
  ————————– श्रीकृष्णाचे वैशिष्टे ————————— “श्रीकृष्णाचे जीवन आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे. श्रीकृष्णामध्ये असे अनेक गुण होते, जे आपल्याला परफेक्ट बनवतात. मैत्री निभावणे असो किंवा दाम्पत्य जीवनात सुख, जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी सामंजस्य कायम ठेवले होते. आज आम्ही तुम्हाला श्रीकृष्णामधील अशाच काही गुणांविषयी सांगत आहोत, या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन सुखी बनवू शकता. १. मैत्री निभावणे अर्जुन, सुदामा आणि श्रीदामा हे श्रीकृष्णाचे प्रमुख मित्र होते. जेव्हा-जेव्हा यांच्यावर संकट आले तेव्हा श्रीकृष्णाने सर्वतोपरी यांची मदत केली. आजही श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचा दाखला दिला जातो. २. सुखी दाम्पत्य ग्रंथानुसार, श्रीकृष्णाच्या १६१०८ राण्या होत्या. यामध्ये प्रमुख आठ होत्या. श्रीकृष्णाच्या दाम्पत्य जीवनात तुम्हाला कधीही अशांती दिसून येणार नाही. ते आपल्या प्रत्येक पत्नीला संतुष्ट ठेवत होते ज्यामुळे त्यांच्या संसारात कधीही वाद, कलह नव्हता. ३. नाते निभावणे भगवान श्रीकृष्णाने आपले प्रत्येक नाते प्रामाणिकपणे जपले होते. आपले कुटुंबीय आणि इतर लोकांसाठी द्वारका नागरी निर्

एकत्र कुटुंब ठेवण्याचे काही मंत्र. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
एकत्र कुटुंब असावं असे वाटत असेल तर नक्की वाचा !! बऱ्याच लोकांना वाटते आपले सुद्धा एकत्र कुटुंब असावं. पण आजच्या काळात बऱ्याच लोकांना ते काही कारणाने शक्य होत नाही. नोकरी, शिक्षण वगैरे वगैरे. काहींचे एकमेकाशी पटत नाही. कांहींचे विचार पटत नाहीत. समजून घ्यायला आणि समजून सांगणारे घरात कोणी नसते. तरीही एकत्र कुटुंब पद्धती ही गरज आहे. एकत्र कुटुंब पद्धती हवी असेल तर त्यासाठी खालील काही मुद्दे , टिप्स सर्वांनी पाळल्या पाहिजेत.  घरात जो कोण कर्ता पुरुष / स्त्री असेल त्याने सर्वांना समजून घ्यायला हवे, समजून सांगायला हवे. पण असे करताना आपले विचार त्यांच्यावर लादूनये. छोट्या छोट्या गोष्टी वरून रागावू नये, कोणत्याही कारणाने चीड चीड करू नये त्यामुळे नाराजी निर्माण होते.  कोणाशीही दूजाभाव करू नये, आपली मुले, मुली घरातील इतर सदस्यांची मुळे मुली. अगदी लहान वस्तु असो किंवा मोठी. उदा. चॉकलेट पासून सोन्याच्या वस्तू पर्यंत कोणत्याही बाबतीत दूजाभाव करू नये. काही जरी करायचे असेल तर सर्वांशी बोलून विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. ज्याला जे हवे असेल ते आणावे. कोणताही महत्वाचा निर्णय घेताना सर्वांशी बोलून विच

औक्षण (ओवाळणे) मधुन मिळते प्रचंड उर्जा. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
तेजोमय तेजोवलाय(ऑरा) वाढविणारे औक्षण -ओवाळणे Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another. असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो न्यूटन चा नियम , माहीती आहे ” पण – ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे.पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते. असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो माहीती आहे – एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे , I don’t believe this ” अहो , न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं. देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय ? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते ! सत् – चित्-आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही ! परमात्मा म्हणा वा एनर्जी – दोन्ही एकच “ अनादीअनंत ” “ माझा देवावर विश्वास नाही ” हे आताशा चालतं. पण ” माझा उर्जेवर विश्वास नाही ” असे एखाद्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत म्हणून पहा. हकालपट्टीच होईल खास ! असो. मनुष्य हा एक अनंत उर्जेच्या कणांनी बनलेला उर्जेचा

लेखणीचा सरदार. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
एका खेड्यातील या व्यक्तीने लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरवीचा पोवाडा थेट रशियात गाजला, तो रशियन भाषेत अनुवादित ही झाला, राष्ट्र अध्यक्षांकडुन सन्मान झाला. ही चकित करणारी किमया होती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची. यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव जि. सांगली येथे झाला. अण्णा भाऊंच्या पोवाड्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा गोवा मुक्ती संग्राम यामध्ये चैतन्य आणले. त्यांच्या लालबावटा पथकाने लोकजागृती केली. ही चळवळ यशस्वी होण्यात त्यांचे मोठे योगदान होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा नेहेमीच जनसामान्य होता. त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी लेखणीचा उपयोग केला. त्यांच्या जीवनानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचा विलक्षण पगडा होता. अण्णा भाऊंच्या साहित्याने आज मराठी साहित्य दालन समृद्ध झालेय. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांचा न्यायासाठी लढा सुरुच होता. त्यांनी जीवनात बराच संघर्ष केला. या संघर्षमय जीवनात अलौकिक प्रतिभेचा साहित्यप्रवास हा थक्क करणारा आहे. ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथा संग्रह, १२ पटकथा, ७ लोकनाट्य.. एक विदेशाचे