पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्यसनाची संगत संपवी आयुष्याची रंगत. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
व्यसनांबाबत कितीही प्रबोधन झाले तरीही याला तरुणाईची मस्ती दाद देत नाही, असेच म्हणावे लागेल. मात्र एखादा विषय जोपर्यंत डोक्यात शिरत नाही तोपर्यंत तो सातत्याने डोळ्यासमोर लादला गेला पाहिजे. म्हणुन प्रबोधन होणे गरजेचे आहे. सरकार एकीकडे व्यसनमुक्तीचा प्रचार करत आहे तर दुसरीकडे मात्र दारू सिगरेट तंबाखू यांचे कारखाने उभारण्यासाठी परवानगी देत आहे. सरकारच्या या दुप्पटी धोरणामुळे दिवसा गणित व्यसनाधीन तरुण-तरुणींची संख्या वाढत चाललेले आपल्याला दिसत आहे. आता मंग व्यसनाधीनतेचा हा वेगानं होणारा प्रादुर्भाव रोखायचा कसा? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एकच प्रबोधन. प्रबोधनाच्या माध्यमातून आपण जे तरुण-तरुणी व्यसनांमध्ये पडणार आहे यांना नशेपासून रोखू शकतो आणि हे नव्याने व्यसन करायला लागलेले आहे त्यांना आपण समुपदेशनाने व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढू शकतो. जवळपास 80 टक्के आपण प्रबोधनाच्या माध्यमातून आणि 20 टक्के उपचाराच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो. व्यसनमुक्ती काळाची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरच समाजाची व देशाची प्रगती होईल असे मला वाटते. सह

पारंपरिक होळी सोबतच व्यसनांची होळी साजरी करावी तरूणाईला वारकरी मंच कडुन आवाहन.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.

इमेज
पारंपरिक होळी सोबतच व्यसनांची होळी साजरी करावी असे तरुणाईला आवाहन.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर. व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक हानी होत असते. यामुळे अनेक कुटूंबेही उध्वस्त झाली आहेत. यामुळे गुन्हे, घात-अपघांतामध्येही वाढ झालेली असतानाही नागरीक त्यात गुरफटत असल्याने त्यापासून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून वारकरी मंचाच्या वतीने व्यसनांची होळी करण्यात यावी असे आवाहन तरूणाईला करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी त्यांना जडलेले व्यसन एका कोऱ्या कागदावर लिहून त्याचे होळीत दहन केले पाहिजे, जे निर्व्यसनी आहेत त्यांनी होळीमध्ये कोरे कागद टाकून व्यसनांपासून दूर असल्याचे सांगुन होळीच्या अग्निला साक्षी ठेवून मी आजच्या दिवसापासून कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही, अशी शपथ घेतली पाहिजे. वारकरी मंच महाराष्ट्र राज्य राबवत असलेल्या व्यसन मुक्ती अभियानाचा पहिला टप्पा जनजागृती या विषयावर बोलताना ही भावना अभियान प्रमुख ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर यांनी व्यक्त केली.

व्यसनाधीनता राष्ट्र हितासाठी मारक.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
व्यसनाधीनता राष्ट्र हितासाठी मारक- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख. सध्या जगामध्ये मृत्युच्या कारणांमध्ये व्यसन हे चौथ्या क्रमांकावर आहे.जगभरात दरवर्षी ८ ते १० लाख लोक फक्त तंबाकूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात. जवळपास १६ करोड तरुण वर्ग दारुच्या आहारी गेलेला आहे. आजकाल पुरुष व तरुणांबरोबरच स्त्रिया व मुले यांच्यामध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यसनांच्या पदार्थांमध्ये मुख्यतः गुठखा, तंबाखू, दारू तसेच चरस,गांजा,अफू,झोपेच्या गोळ्या किंवा इतर मादक पदार्थ असू शकतात.अलीकडेच इंटरनेट व स्मार्टफोनचीही व्यसनाधीनता होऊ शकते असे म्हटले जातेय. भारतात व्यसनामुळे युवा पिढी वाया जात आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. आजचा युवक हा देशाचे भविष्य आहे. मात्र व्यसनाधीन युवा वर्ग देश कसा सांभाळणार, असा प्रश्न पडतो. व्यसनाधीनता आणि युवा पिढी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न. व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. कोणतीही व्य

छत्रपतींची ललकारी. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
छत्रपतींची ललकारी. महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तीला मराठीत गारद म्हणतात ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला अल्काब तर संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली म्हणले जाते छत्रपती शिवरायांची अल्काब व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात #दुर्गपती - गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य (राज्य) आहे असे #गज_अश्वपती - असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो #भूपती_प्रजापती - वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे #सुवर्णरत्नश्रीपती - नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे शिवरायांच्या बाबती ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती #अष्टावधानजागृत - आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा ) #अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात न

धन्यवाद साप्ताहिक शिव पर्व.

इमेज
SPप्रतिनीधी:१२ मार्च: वारकरी मंच महाराष्ट्र राज्य चालवत असलेल्या व्यसन मुक्ती अभियानाचा जनजागृती हा पहिला टप्पा गावपातळीवर राबवण्यात येणार असुन मार्च अखेरपर्यंत गावोगावी जाऊन व्यसनाचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक दुष्परिणाम या बाबतीत मी स्वता प्रबोधन करणार आहे अशी माहिती ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख यांनी साप्ताहिक शिव पर्व च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख पुढे म्हणाले की तरूणाईला व्यसनांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावपातळीवर हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे या अभियानात तरूण तरूणी ही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. पुढे ते म्हणाले की व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. जो पर्यंत एखादे गाव व्यसन मुक्त होणार नाही तो पर्यंत त्या गावाची प्रगती व परिणामी राष्ट्राची ही प्रगती होणार नाही. व्यसन हे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करणार तर आहेच परंतु कुटुंबासोबत राष्ट्र हितासाठी देखील मारक आहे. या साठीच व्यसन मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय वारकरी मंचाने घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिव पर्व शी ब