भारतीय संस्कृती खूप मजबूत आहे त्याचबरोबर भारतीय संस्कृती प्राचीन आहे. खरंतर ही संस्कृती टिकवण्याचा मजबूत आणि योग्य असा एकमेव मार्ग म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होय असं मला वाटतं. परंतु आधुनिक युगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती उदयास येऊन खरंतर या संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम नवा विचाराने झाल्याचे आपल्यास पाहायला मिळते. प्रस्तुत लेखात आपण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे होनारे नुसकान, कुटुंबाची होणारी वाताहत, त्यातून त्या घरातील लहान मुलांच्या बालमनावर होणारे परिणाम, आपल्याच नात्यांसोबत होणारे कटू संबंध, विभक्त होण्याची कारणे आणि आपल्यातीलच काही लोकांनी घरफोडी वृत्तीला दिलेला थारा या सर्व गोष्टींमुळे समाजामध्ये आपली पत ढासळुन आपण आर्थिक व वैचारिक दृष्ट्या अधोगतीला जाण्याची कारणे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. घर खरच कोणामुळे फुटते..? बहूतेकवेळा याचे खापर स्त्रियांच्या माथी मारले जाते. कोणाचेही घर स्त्रिमुळे फुटत नाही तर ते स्वार्थामुळे फुटत असते, मग तो कुटुंबातील स्त्री, पुरूष कोणातही निर्माण होऊ द्यात. मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते, मग पतीला समर्थन देणे हे ...