पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परमेश्वर पहायचा नाही अनुभवायचा. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
गाढ झोपेतही हृदयाचे स्पंदन चालू रहाणे, श्वासोछ्वास चालू रहाणे, पचनक्रिया चालू रहाणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे, पृथ्वीतलावर पाणी निर्माण होणे, शरीरांतर्गत सर्व इंद्रियांनी शिस्तपूर्वक कामे करणे, अंतराळांतील प्रत्येक ग्रहगोलांनी भ्रमणकक्षा सांभाळणे, फुलांमध्ये सौरभ निर्माण होणे, बीजातून वृक्ष निर्माण होणे, बाळाच्या जन्माआधी मातेच्या स्तनात दूध निर्माण होणे, पिलासाठी आधीच चाऱ्याची सोय निर्माण होणे, एवढ्याशा स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे, दोन डोळे, दोन कान, एक नाक, दोन ओठ यातून निर्माण होणाऱ्या अवयवांतून एवढ्या विविधता निर्माण होणे, मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे, एकदा चालू झालेले हृदय शंभर वर्षे सुध्दा दिवसरात्र अविश्रांत स्पंदत रहाणे, बोललेल्या स्वरांचे ऐकणाऱ्याच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे. सर्वत्र परमेश्वराची सत्ता जाणवते.  परमेश्वर पहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा. अहंकार सोडून, निगर्वी होऊन आणि निःशंकपणे. जयाच्या बळे चालतो हा पसारा । नमस्कार त्या ब्रम्हतत्वा अपारा ।।

वारकरी संप्रदायात तुळशीचे महत्त्व. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर। तेथ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।। तुलसीवृंदावन ज्याचे घरी । त्यासी प्रसन्न श्रीहरी। तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।। अर्थ -  ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे, तेथे यमदूतांचे वास्तव्य असते. परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्या लोकांच्या घरात तुळशी वृंदावन आहे त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात. जो व्यक्ती तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरीचे स्मरण करतो तो जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. या सर्व गोष्टींमुळे वारकरी संप्रदायात तुळशीचे खास महत्त्व आहे. ----------------------------------------------- सर्व वैष्णव संप्रदायात गळ्यात तुळशीमाळ का घालतात? ----------------------------------------------- सर्व  वैष्णव संप्रदायात तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ करून ती नेहमी गळ्यात धारण करतात.  तुलसीमाला धारण करणाऱ्यास पदोपदी अश्वमेधाचे फल प्राप्त होते, असे ब्रह्मवैवर्तपुराणात  म्हटले आहे.  पंढरीची वारी करणाऱ्या वारकरी स्त्रिया आपल्या डोक्यावरून पितळी तुलसीवृंदावन पंढरपुरास नेतात. निधनसमयी मृताच्या मुखात

संत सहवासानेच मनुष्य जिवनाचा उध्दार होवु शकतो. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
संत एकनाथ महाराजांचे सामर्थ्य सद्गूरु आणि संत सहवासानेच मनुष्य जिवनाचा उध्दार होवु शकतो. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य रहात होते. सर्व प्राणिमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने 'दंडवतस्वामी' म्हणत असत.      एकदा ते मार्गाने चालले असतांना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, ''काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का ?'' ''त्याच्यातही परमेश्वर आहे'', असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले.      गाढव जिवंत झाले, ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवत स्वामींना म्हणाले, ''स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली, तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्यांचे नातेवाईक मृत होतील, ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. हे

संत जनाबाई. By Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
                   🔱🕉संत जनाबाई🕉🔱 जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयतां नियमितपणे पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलंनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू

घटस्थापना. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
“घटस्थापना एक कृषकौत्सव” गणनायिकांचा उत्सव, मातृसंस्कृतीची ओळख, सिंधूसंस्कृतीचे आद्य जोडपे शिव-पार्वती अन् तेव्हापासून चालत आलेली मातृसत्ताक पध्दतीची मानवतावादी परंपरा व त्याचाच एक भाग म्हणजे नवरात्रोत्सव सोहळा होय. घटस्थापना याच दिवशी गणनायिकांनी म्हणजे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. याचाच प्रत्यय म्हणजे माती चौरंगावर ठेवून त्यावर धान्य टाकून त्यात कोणत पिक दहा दिवसात जोमाने येते हे तपासलं जायचं अन् त्याच धान्याची शेती केल्या जायची. स्त्री गरोदर असतांना तिला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की जर कुशीत बाळ जगू शकते, तर बी जमीनीत रुजवले तर त्यातुन झाड उगवू शकते. आदिमानवाचा मुख्य व्यवसाय शेती नव्हता तर शिकार करणे हा होता. तेव्हा स्त्रिया शिकारीला न जाता मुलं सांभाळत आणि फावल्या वेळात स्त्रिने शेतीचा शोध लावला, असे मानायला हरकत नाही. शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला म्हणूनच त्या स्त्रियांबदद्ल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नवरात्रोत्सव असा असायचा पण सध्य स्थितीत मातृसत्ताक सोहळ्याला कर्मकांडाचे रूप मिळालेले दिसून येत आहे. मातृसत्ताक संस्कतीची ओळख म्हणजे सिंधू नदीच्या खोय्रात -“राण

अध्यात्म म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
कवित्व आणि तत्व वाचे बरवे कवित्व | कवित्वी बरवे रसिकत्व | रसिकत्वीही परतत्व | स्पर्श जैसा || ३४५|८|ज्ञा. भाषेमध्ये कविता, कवितेच्या जोडीला रसिकता, आणि रसिकतेला स्पर्श असावा, तत्वज्ञानाचा अशी ही चढती कमान आहे. तत्वज्ञान किंवा अध्यात्म ह्या गोष्टी आपल्या डोक्यावरून जातात, त्या विषयांमध्ये आम्हाला रस नाही असे म्हणणारे लोक एका अर्थाने अनाहूतपणे आपली स्वतःची फसवणूक करत असतात कारण कधीना कधी कामाच्या धबडग्यातून डोके बाहेर पडते तेव्हा मी कोण आहे? मी कोठून आलो? आणि माझे पुढे काय होणार आहे ? असले तीन विचार प्रत्येकाच्या मनामध्ये डोकावतातच. दुःखाच्या प्रसंगात माझ्याच बाबतीत असे का घडले किंवा अनपेक्षितपणे आयुष्याला कलाटणी मिळाल्यावर हे कसे काय घडले बुवा? असे प्रश्नही माणूस काही काळ तरी चघळत राहतो. शहरातला माणूस निसर्गाच्या सान्निध्यात प्रवासाच्या निमित्ताने गेला आणि त्याचे मन सजग असेल तर निसर्गातल्या वैविध्यपूर्ण सौंदर्याने आणि रचनेने तो प्रभावित होतोच परंतु निसर्गातल्या पशुपक्षी आणि वनस्पतींच्या लाजवाब घडणीने अवाकही होतो. हे कसे झाले, कोणी केले की आपोआप घडत गेले? अरण्यातले मानवरहित जी

ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज एकत्र येणे ही काळाची गरज. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
नाब्रह्म क्षत्रमृध्नोति ना क्षत्रं ब्रह्म वर्धते । ब्रह्म क्षत्रं च सम्पृक्तम् इह चामुत्र वर्धते ॥ – मनुस्मृति, अध्याय ९, श्‍लोक ३२२ अर्थ : ब्राह्मतेजाविना क्षात्रतेज वाढू शकत नाही आणि क्षात्रतेजाविना ब्राह्मतेज वाढू शकत नाही. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आले, तर त्यांचा या लोकी, तसेच परलोकीही उत्कर्ष होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय जर एकत्र आले, तर ते दोघे मिळून वनेच्या वने जाळणार्‍या अग्नीप्रमाणे शत्रूंना जाळून टाकतील. महाभारतात असे सांगितलेे आहे की, ब्रह्म क्षत्रेण संसृष्टं क्षत्रं च ब्रह्मणा सह । उदीर्णौ दहतः शत्रून् वनानीवाग्निमारुतौ ॥ – महाभारत, पर्व ३, अध्याय २७, श्‍लोक १० अर्थ : वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील. खरंतर आज चाललेल्या निती अनितीच्या लढाईत, अधर्म च्या या लढाईत ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज एकत्र नाही आले तर अधर्मी लोक आपल्या कृत्यांद्वारे जाती पतीचे राजकारण करतील आणि जर असं झालं तर राष्ट्र, धर्म आणि पर्यायाने सुसंस्कृत वारसेच पतन अटळ आहे म्हणू

तलवारीचा इतिहास. By Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
तलवार : (तरवार). एक प्राचीन व परंपरागत शस्त्र. धनुर्वेदातील वर्गीकरणानुसार तलवार हे अमुक्त म्हणजे हातात धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. तलवारीने शत्रूला भोसकून, फटकारून आणि घाव घालून घायाळ करता येते. पूर्वीच्या काळी पदाती सैनिक व घोडेस्वार द्वंद्वयुद्धासाठी तलवार वापरीत. तलवारीच्या मारामुळे होणाऱ्या दुखापती कमी करण्यासाठी ढाल व चिलखत यांचा उपयोग होत असे. शत्रूच्या तलवारीचे वार स्वतःच्या तलवारीवर झेलून किंवा चुकवून आत्मरक्षण करण्याची प्रथा आहे. पाते व मूठ हे तलवारीचे दोन मुख्य भाग होत. प्रारंभ काळात तलवारीच्या पात्याचा आकार कण्हेरीच्या पानासारखा असल्यामुळे पात्यास पान असेही म्हटले जाते. सामान्यपणे पात्यावरूनच तलवारींचे वर्गीकरण केले जाते. हे पाते मुठीमध्ये बसवून तलवार हाताच्या पंज्यात पकडता येते आणि मुठीमुळे पंज्याचे व बोटांचे रक्षणही होते. मुठीचेही विविध प्रकार आढळतात. पात्याच्या आकार, प्रकारातील विविधतेवरून ती वापरणाऱ्याची मनोभूमिका कळून येते त्याचप्रमाणे लढाईत तलवार कशा रीतीने हाताळली जात असावी, हे समजते. अश्मयुगातील दगडी धारदार आयुधापासून तलवार उत्क्रांत झाली असावी

पैसा नीतिधर्माने मिळवावा. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
                  🌹प्रवचनाचा विषय🌹          🕉🔱पैसा नीतिधर्माने मिळवावा.🕉🔱 🕉🔱काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. 🕉🔱पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली, तर तो पैसाच दूर केला तर नाही चालणार❓ पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जिवापाड श्रम करून जो कमवायचा, तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग❓ 🕉🔱पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे, किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे; आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूरआहे. पैसा मिळवावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये. 🕉🔱पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला,आणि यदा कदाचित तो गेला,तर भगवंताच्या इच्छेने गेला,असे म्हणून,आपले समाधान बिघडू देऊ नये.पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही;आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. 🕉🔱अशी म्हण आहे की, ’पैसा पुरून उरावा इतका मिळावा.’ पण आपल्याला जगात काय आढळते ❓ जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर