वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी मंत्र. By-Nilesh Konde-Deshmukh
🔴वैवाहिक जीवन बळकट नसण्याची कारणे. वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी काही लहान -लहान गोष्टींना लक्षात घेणं आवश्यक असतं. सध्याच्या आधुनिक काळात शुल्लक कारणांवरून वितंडवाद होतो आणि तो घटस्फोटावर जाऊन थांबतो. वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी न घेतल्यानं नात्यात दुरावा वाढतो. 🔴 संवादाचा अभाव. 👉 वैवाहिक जीवनात संवादाच्या अभावामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. नवरा-बायकोमध्ये संवादाचा अभाव नसावा. नात्यात संवादाच्या अभावामुळे नातं कमकुवत होऊ लागतं. जर का आपणास आपल्या नात्याला अधिक घट्ट करावयाचे असल्यास संवादाचा अभाव होऊ देऊ नका. एकमेकांशी मन मोकळं करून संवाद साधा. 🔴गोष्टी सामायिक न केल्यानं. 👉 वैवाहिक जीवनात एकमेकांशी गोष्टी सामायिक न केल्यानं देखील नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा वाढतो. आपल्या वैवाहिक जीवनाला बळकट करण्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांशी सर्व गोष्टी सामायिक कराव्यात. यामुळे आपापसातील संवाद वाढतो आणि सर्व गोष्टींना सामायिक केल्यानं नातं घट्ट होतं. 🔴 राग केल्यानं. 👉 वैवाहिक जीवनात रुसवे-फुगवे तर होतातच, त्याशिवाय त्याला रस येत नाही. पण जर का हा राग किंवा रुसवे-फुगवे वि...