पोस्ट्स

ही आपलीच कथा आहे आणि राजा आपणच By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  ©® निलेश एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा? ❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा! ❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ? ❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!! ❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?" ❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे. ❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही. ❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ? ❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही. ❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ? ❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य ...

लोक काय म्हणतील? By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढण्यासाठी मी एक कहानी सांगतो,  पहा तुम्हाला पटते का ? एका भांड्यात चार मेंढक पडलेले होते . त्यातून एक मेंढक उड़ी मारून बाहेर यायचा प्रयत्न करत होता पण को बाहेर पडू शकला नाही. दूसरा मेंढकाने प्रयत्न केला तो पण अपयशी ठरला. आता तिसरा मेंढक प्रयत्न करू की नको विचार करत होता, त्याला अपयशी झालेल्या मेढकानी सांगितले, नको करू प्रयत्न, तू बाहेर पडू शकणार नाही. तरीही त्याने एक वेळा प्रयत्न केला आणि अपयशी ठरला. तीन्ही मेंढक अपयशी ठरले. आता तिन्ही चौथ्याला ओरडून ओरडून वारंवार सांगायला लागले कि, तू प्रयत्न करू नकोय, काहीही फायदा होणार नाही. परंतु चौथ्या मेंढकाने एक उंच उडी मारली आणि चमत्कार झाला, तो भांड्याच्या बाहेर पडला. कारण चौथा मेंढक बहिरा होता, त्याला इतर तिघांनी जे ओरडून ओरडून सांगितले ते ऐकूच आले नाही, तो आपल्या प्रयत्नात यशस्वी झाला. कहानी सांगायचा तात्पर्य  आपल्याला समजलाच असेल, लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपण आपले कार्य चांगल्या मनाने व ठामपणे चालू ठेवावे. " लोकांचे ऐकल्यानंतर तर जंगलाच्या वाघाला सुध्दा सर्कसीमध्ये नाचायला तैयार व्हावं ...

पदर एक जादुई शब्द. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
पदर  एक जादुई  शब्द  आहे . काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन अक्षरी  शब्द.  केवढं  विश्‍व., सामावलेलं  आहे त्यात....!! किती अर्थ, किती  महत्त्व..काय  आहे  हा  पदर..!? साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा भाग.......!! तो  स्त्रीच्या  "लज्जेचं रक्षण" तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण,आणखी ही बरीच " कर्तव्यं " पार पाडत असतो..!  या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,कसा  अन्‌  कशासाठी  करेल, ते  सांगताच  येत  नाही..!? सौंदर्य  खुलवण्यासाठी " सुंदरता "  पदर असलेली " साडी " निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान" पदरांची" जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या  जणींमध्ये चर्चाही तीच..!! लहान  मूल  आणि "आईचा  पदर"  हे अजब  नातं  आहे. मूल  तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन  "अमृत  प्राशन" करण्याचा हक्क बजावतं....

साहित्यात गुढीपाडव्याचा By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
गुढी पाडव्याचा पहिला संदर्भ पुराणांमध्ये मिळतो. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तो आपला पहिला वर्षदिवस होय. इंद्राने याच पाडव्याच्या दिवशी दधिची ऋषींच्या अस्थींच्या योगे बनविलेल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला. रामायण काळात श्रीरामांनी आपल्या राज्यकारभाराला या शुभदिनी आरंभ केला. शालिवाहनाने आपला नवीन शक या दिवसापासून सुरू केला. आता मराठी साहित्यात गुढी पाडव्याचा उल्लेख कुठे केला आहे ते पाहू. हे साहित्य अर्थातच शंभूराजांच्या हौतात्म्य दिनाच्या शेकडो वर्षे अगोदरपासून रचले जात आहे.. ज्ञानेश्वरी – अध्याय ४ था ओवी ५२ वी अधर्मा ची अवधी तोंडी I दोषांची लिहिली फाडी II सज्जनां करवी गुढी I सुखाची उभवी II ज्ञानेश्वरी – अध्याय ६ वा ओवी ५२ वी ऐके संन्यासी तोचि योगी I ऐसी एकवाक्यतेचि जगी II गुढी उभविली अनेगीं I शास्त्रांतरीं II ज्ञानेश्वरी – अध्याय १४ वा ओवी ४१० वी माझी अवसरी ते फेडी I विजयाची सांगे गुढी II येरु जीवीं म्हणे सांडी I गोठी यिया II  लीळाचरित्र -पंडित म्हाइंभट सराळेकर (इ. स . १२७८ च्या आसपास) लीळा २०८ मधील उल्लेख – ” देमती तुरंगम आरोहणी मध्ये – …. “तेथ बाईसासे भाचे दाएनाऐकू होते...

ठेच-लागलीच पाहिजे. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
ठेच-लागलीच पाहिजे. मित्रांनो,! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं, इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून, एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत, आणि इतकी की, त्या क्षणी असं वाटावं की, आता सगळंच संपलं! परिस्थितीसमोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, काही ठिकाणी तर स्वता:ला गहाण टाकण्याची वेळ यावी, कधी तरी कुणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा, कुणाचीतरी हजारवेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासांनी निद्रेचा नाश व्हावा, रडून रडून डोळे सुजावेत, इतका अफाट त्रास व्हावा ! अक्षरशः सगळं सोडून जावं की, काय असं वाटावं. अन् मग बघावं, ह्या वेदनांतून तावून, सुलाखून, निघाल्यावर उभं राहतं ते एक वेगळंच अजब रसायन.!! ज्याला कुणाच्या असण्या-नसण्याचा, काही फरकच पडत नाही. तो जगतो फक्त आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय, या एकाच तत्वावर...

छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे परिस्थितीची आणि काळाची गरज आहे. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर मो नं ९८९००१३५२० २० वर्षात मेहनत करून कमवलेलं १ वर्षात ९०% पेक्षा जास्त गमवावे लागले. आणि शिवाय स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाच आयुष्य पणाला लावून कॉम्पीटिटरच्या समोर जाऊन उभ रहावं लागलं.  कॉम्पीटिटर स्वतःला हजारो किलोमीटर स्वतःच्या मूळ लोकेशन पासुन दुर ठेवून त्या तरुणाला संपवण्याचा प्लॅन करतो. केवढा धक्का..केवढा फ्रस्ट्रेशन केवढा सेटबॅक !! आणि विशेष म्हणजे तो 36 वर्षाचा तरुण आत्महत्या करत नाही. त्याही परिस्थितीमध्ये मनोधैर्य  न खचता स्वतःची टीम तयार करतो. आणि पेशन्स ठेवत कॉम्पिटिटरला मात देवुन तीस वर्षाच्या मेहनतीने कमावलेलं जे गमावलं होतं ते पुढील १ वर्षात पुन्हा कमवतो. आणि एवढंच नाही तर समोरील असलेल्या कॉम्पिटिटरला ही जबरदस्त तडाखे देतो. सगळ्या गोष्टींवर उपाय शोधणारा तो ३६ वर्षांचा तरुण... "छत्रपती शिवाजी महाराज" महाराजांच्या आयुष्यातील सेटबॅक म्हणजे पुरंदर चा तह होय. ज्यात महाराजांनी ९०% हुन अधिक किल्ले औरंगजेबाला दिले. चार पाच पावले मागे आले नव्हे तर तब्बल २० वर्ष मागे आले. परंतु या ही पेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे महाराजांनी पुढील ८ ...

जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh. 📚 भिकाऱ्यात पण माणूसपण दिसायला लागते. 📚 चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 📚 प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो. 📚 एखाद्याची चूक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. 📚 कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलू नये हे कळते. 📚 चाकू, बंदुक यांच्या पेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते. 📚 आई वडीलांची किंमत कळायला लागते. 📚 ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण, या गोष्टी म्हणजे पूर्ण जीवन संपले हा गैरसमज दूर होतो. 📚 या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात. 📚 प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते. 📚 सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते. 📚 कलाकार चित्रपटात नि नाटकात काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खूप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते. 📚 या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत. राहिलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत. काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट ह...

चांगले पुण्यकर्म करत राहा.By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
चांगले पुण्यकर्म करत राहा. By-Nilesh Konde-Deshmukh. (गोष्ट तशी काल्पनिक आहे परंतु पुण्य कर्मावर आधारित आहे) एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा? ❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा! ❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ? ❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!! ❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?" ❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे. ❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही. ❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ? ❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही. ❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे प...

संजीवन समाधी म्हणजे नेमके काय. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म  अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी *"संजीवन समाधी"* घेतलेली आहे. सामान्यत: लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असेल तर त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात. वस्तुत: संजीवन समाधी ही जिवंत समाधी पेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल व विलक्षण आहे. नाथसंप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरुकृपेने ज्ञात असली तरी, श्रीभगवंतांच्याच आज्ञेने या जगात केवळ श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माउलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे, अस...

चला माणूस बनू या.By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते.  ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....       हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय.. जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव  लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते. जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घाटावर, अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा बरोबर नव्हती. जळता...