उर्जा दूषित कुठे आणि कशातुन होते. By-Nilesh Konde-Deshmukh
आपली ऊर्जा दूषित कुठे आणि कशी कशातून होते ! १] दृष्टीने २] स्पर्शाने ३]श्रवणाने ४]अन्नातून ५] दूषित जागेतून ६] पाण्यातून ७] वाणी ८] श्वासामार्फत ! १] दृष्टी ः- आपण जे काही चांगले वाईट पाहतो ते आपली ऊर्जा ग्रहण करते आणि जे जे काही पाहीले आहे ते संग्रहित करते ! त्यातील जे आवश्यक आहे ते कार्यात येऊन कार्यांवित होते परंतु जे अनावश्यक आहे आणि जे संग्रहित आहे ते पुन्हा पुन्हा दृष्टी पटलावर येऊन आपल्या मनाची स्थिती बिघवते ! ध्यान साधनेत अडथळा निर्माण करते ! विचार दूषित करते ! या सर्व आठवणी मिटवण्यासाठी पुन्हा आपली ऊर्जा वेळ खर्च होते ! २] स्पर्श ः- आपण ज्या ज्या वस्तु व्यक्तिना फळ फुल झाडे वेलीना स्पर्श करतो त्यातील सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्या कळत नकळत ग्रहण होते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होतो ! उदाः- आपल्या लहान पणी वापरलेली एकादी वस्तू सायकल च घेऊ त्याला आपण स्पर्श केला की त्याच्या बरोबर असलेल्या चांगल्या वाईट आठवणी लगेच ताज्या होतात आणि त्या आठवणी आपल्यावर चांगला वाईट परिणाम करतात ! तसेच एखाद्या व्यक्...