पोस्ट्स

निरपेक्ष व निस्वार्थ प्रेम फक्त माताच करु जाणे. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
👉आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने मुलाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे ?  👉तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझं आजारपण, पडणं, रडणं, दुखणं, भरवणं, शिकवणं.. काय काय नाही केलं. स्वत:च जगणंच विसरले मी."  👉 मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."  👉 आई स्मितहास्य करीत म्हणाली, " अरे वेडया ! हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन हो ! तू जेव्हां खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."  👉 मुलगा म्हणाला, "बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर "  👉 आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच इच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न करावं ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम...

कर्म सिद्धांत. By-Nilesh Konde-Deshmukh

 #कर्माचा_सिद्धांत कोणाची ही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परीनाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय,  पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल, .... अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ... जसे की शारिरीक, मानसिक, आर्थिक,..... अपमानास्पद वागणुक,... कोणांचे मन दुखावले असू शकते....,कोणावर अन्याय केला गेलेला असतो, ..... कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते,..... छळ केलेला असेल, शारिरीक दुखापत केलेली असेल, ....... किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ...... त्रासाचे कुठलेही कारण असो... वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो,  जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल,   पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही,किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमधे शोषली जाते,मग ...

स्वस्तिक चिन्हाचे महत्व . By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  स्वस्तिक दरवाजावर असल्याने वाईट शक्तींचे आपल्या घरात प्रवेश होत नाही परिणामी आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते. ‼️ हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या स्वस्तिक चिन्हाविषयी  माहिती.‼️ १. स्वस्तिक हे कशाचे प्रतिक आहे ? = समृद्धी, मांगल्य,शांती २. ते कोणत्या बोटाने काढावे ? = अनामिका ३. या चिन्हाचा जीवनातील अर्थ = कल्याण असो ४. यामुळे जीवन कसे रहाते ? = गतिमान ? ५. कोणत्या देवतेचे साकार रूप आहे ? = श्रीगणेश ६. कोणत्या देवतेचे आसन मानले आहे ? = सूर्य ७. यातील उभी रेघ काय दर्शविते ? = विश्वाच्या उत्पत्तीचे कारण ८. आडवी रेघ काय दर्शविते ? = विश्वाचा विस्तार ९. चार भुजा कशाचे प्रतिक आहेत ? = धर्म,अर्थ,काम व मोक्ष १०. चार भुजांवर स्थित गुण कोणते ? = आशीर्वाद,कल्याण,प्रीती व सौंदर्य ११. डाव्या व उजव्या बाजूच्या रेघा कशाचे प्रतिक आहेत ? = शुभलाभ,रिद्धीसिद्धी १२. कोणत्या बिंदूपासून काढतात ? = मध्यबिंदूपासून १३. चार ठिपके म्हणजे या चार देवता होत.. = गौरी,पृथ्वी,कूर्म,अनंत १४. स्वस्तिकातील कल्याण भावना कोणती ? = वसुधैव कुटुंबकम् १५. शुभ म्हणून कोठे काढतात ? = मंदिर,घराचे मुख्यद्वार, अंतरपाट...

भगवद्गीता का वाचावी? By- Nilesh Konde-Deshmukh

 ------------------------------------------------ *"भगवद्गीता "*  *का वाचावी याची १८ कारणे  _" विज्ञान म्हणते कुठलीही गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवय त्याचा निष्कर्ष काढू नये "_  *म्हणुन जरूर ऐकदा तरी भगवतगीता वाचा...* भगवतगीता वाचताना अर्जुन आपण स्वता आहोत व तो जे प्रश्न विचारतो ते आपण विचारतो आहोत्त असे समजावे.. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर मिळतील. *कारने (अध्ययानुसार)* *१) अर्जुनविषादयोग-* यामधे तूमचे जेवढे प्रश्न असतील यामधे असतील . तसेच आपले मन आपल्या ताब्यात नसते . द्विविधा मनस्थिति, राग, एकाद्या गोष्टीचा मोह अश्या परिस्थितीत आपले मन जशी प्रतिक्रिया देते ते या अध्ययात आहे. *२) सांख्ययोग -*  यामधे आपले शरीर व आत्मा या दोघांमधे काय अंतर आहे आत्मा हा अमर आहे व शरीर (मन/बुद्धि) कोणतीही घटना घड़ताना कशी टप्या टप्या प्रतिक्रिया देते याचे वीस्तृत वर्णन यामधे केले आहे. *३) कर्मयोग -* प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म ( काम ) करावेच लागते.काही करने व काहीही न करने हेही १ कर्म (काम) च आहे. जे आपल्या हातात आहे . तसेच इन्द्रिय ,मन व बुद्धि यांचा परस्पर कसा स...

शनिवारी पिंपळाच्या झाडाची पुजा का करावी. By - Nilesh Konde-Deshmukh

 शनिवारी का केली जाते* *पिंपळाच्या झाडाची पूजा?* भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासूनच भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. असे मानले जाते की, पिंपळाच्या झाडाचे दर्शन-पूजन केल्याने दीर्घायुष आणि समृद्धी प्राप्त होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, शनिवारी पिंपळाच्या झाडाचे शास्त्रामध्ये विशेष महत्त्व का आहे?  धार्मिक मान्यतेनुसार, शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घातल्याने शनि पिडा दूर होते. आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणांनी भरलेले असल्याचे सांगितले आहे.  शनि अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. श्रावण महिन्यात अमावस्या झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान असून...

लढवय्या महिलांच्या जिद्दीला सलाम. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  'अलिसीया मोंटानो' ह्या महिलेने इतिहास घडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'साडेआठ महिने' प्रेग्नन्ट असलेल्या या अमेरिकन धावपटूने 800मी ची शर्यत 2 मिनिटे आणि 32.13 सेकंदात पूर्ण केली. पाच वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली अलीसिया ह्या शर्यतीत तिच्या वैयक्तिक सर्वोच्च (मोनॅको) रेकॉर्ड पेक्षा फक्त 35 सेकंद हळू धावली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, "प्रेग्नन्ट असताना मी पहिल्या महिन्यापासून धावण्याचा सराव करते आहे. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम फार महत्वाचा असतो. मला धावताना मजा वाटते. फिटनेस वाटतो. त्यामुळे चौतीस आठवडे प्रेग्नन्ट असूनही मला विशेष त्रास झाला नाही. ह्याही वेळी मजाच आली." स्पर्धेत ती बाकीच्या स्पर्धकांच्या मागे पडली नाही. पहिल्या लॅपपासूनच ती वेगाने धावत होती. तिने पहिला लॅप पूर्ण केल्यावर प्रेक्षकांच्या टाळ्या पडू लागल्या आणि तिने शर्यत पूर्ण करेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या.  हे सर्व अलीसियाने अगदी विचारपूर्वक केलं. ती माध्यमांना सांगते, "मला आधी काळजी वाटत होती. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले की मी ही स्पर्धा धावू शकेल. डॉक्टरांनी मला थांबवलं नाही, उलट स्प...

उर्जा दूषित कुठे आणि कशातुन होते. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  आपली ऊर्जा दूषित कुठे आणि कशी कशातून होते ! १] दृष्टीने २] स्पर्शाने ३]श्रवणाने ४]अन्नातून ५] दूषित जागेतून ६] पाण्यातून ७] वाणी ८] श्वासामार्फत !  १] दृष्टी  ः-   आपण जे काही चांगले वाईट पाहतो ते आपली ऊर्जा ग्रहण करते आणि जे जे काही पाहीले आहे ते संग्रहित करते ! त्यातील जे आवश्यक आहे ते कार्यात येऊन कार्यांवित होते परंतु जे अनावश्यक आहे आणि जे संग्रहित आहे ते पुन्हा पुन्हा दृष्टी पटलावर येऊन आपल्या मनाची स्थिती बिघवते ! ध्यान साधनेत अडथळा निर्माण करते ! विचार दूषित करते ! या सर्व आठवणी मिटवण्यासाठी पुन्हा आपली ऊर्जा वेळ खर्च होते !             २] स्पर्श ः- आपण ज्या ज्या वस्तु व्यक्तिना फळ फुल झाडे वेलीना स्पर्श करतो त्यातील सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्या कळत नकळत ग्रहण होते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यावर होतो ! उदाः- आपल्या लहान पणी वापरलेली एकादी वस्तू सायकल च घेऊ त्याला आपण स्पर्श केला की त्याच्या बरोबर असलेल्या चांगल्या वाईट आठवणी लगेच ताज्या होतात आणि त्या आठवणी आपल्यावर चांगला वाईट परिणाम करतात ! तसेच एखाद्या व्यक्...

पर्यावरण रक्षक अशोकराव बिचकुले. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत विचारावर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या जिवाच रान करणारे पर्यावरण रक्षक श्री अशोकराव बिचकुले मामा. आज मामांच्या लग्नाचा वाढदिवस या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त मामांनी आपला वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा केला. तसं पाहायला गेलं तर वृक्षारोपण हे मामांसाठी काही नवीन नाही. आज आपण जर भोसरी ते नाशिक फाटा या मार्गावर गेलो तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला सुंदर असे हिरवेगार वृक्ष डौलाने मिरवताना दिसतात. हे वृक्ष मामांनी अथक प्रयत्नातून लावलेले आहे. श्री अशोकराव बिचकुले उर्फ मामा या पर्यावरण प्रेमी माणसानं नुसतं वृक्ष लावलेच नाही तर त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वतः घेतली उन्हाळ्यामध्ये त्या वृक्षांना पाणी घालणे असो किंवा पावसाळ्यामध्ये त्याच्या बाजूस गवत काढणे असते हे मामा स्वतः आपल्या हाताने करताना दिसतात. साधी राहणी उच्च विचारसरणी प्रमाणे संत विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मामा पर्यावरण जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आणि विशेष करून आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याकारणाने त्...

वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी मंत्र. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
🔴वैवाहिक जीवन बळकट नसण्याची कारणे. वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी काही लहान -लहान गोष्टींना लक्षात घेणं आवश्यक असतं.    सध्याच्या आधुनिक काळात शुल्लक कारणांवरून वितंडवाद होतो आणि तो घटस्फोटावर जाऊन थांबतो. वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी न घेतल्यानं नात्यात दुरावा वाढतो. 🔴 संवादाचा अभाव. 👉 वैवाहिक जीवनात संवादाच्या अभावामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. नवरा-बायकोमध्ये संवादाचा अभाव नसावा. नात्यात संवादाच्या अभावामुळे नातं कमकुवत होऊ लागतं. जर का आपणास आपल्या नात्याला अधिक घट्ट करावयाचे असल्यास संवादाचा अभाव होऊ देऊ नका. एकमेकांशी मन मोकळं करून संवाद साधा. 🔴गोष्टी सामायिक न केल्यानं. 👉 वैवाहिक जीवनात एकमेकांशी गोष्टी सामायिक न केल्यानं देखील नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा वाढतो. आपल्या वैवाहिक जीवनाला बळकट करण्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांशी सर्व गोष्टी सामायिक कराव्यात. यामुळे आपापसातील संवाद वाढतो आणि सर्व गोष्टींना सामायिक केल्यानं नातं घट्ट होतं. 🔴 राग केल्यानं. 👉 वैवाहिक जीवनात रुसवे-फुगवे तर होतातच, त्याशिवाय त्याला रस येत नाही. पण जर का हा राग किंवा रुसवे-फुगवे वि...

लहान मुलांना घडविताना हे करा. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
🔴1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी. 🔴2. घरात आदळआपट मुलांसमोर  करू नका. 🔴3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला. 🔴4. मुलांना घालून पाडून बोलू नका, मूल तुम्हाला avoide करेल. 🔴5. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरू भेटले कि तुम्ही बदलू शकता वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपणच चांगले गुरू व्हा. 🔴6. मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा. 🔴7. आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. 🔴8. मूल हि investors नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. 🔴9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका. 🔴10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा. 🔴11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा. 🔴12. आपल्या मुलांची गरज समजून घ्या. 🔴13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा/बाप म्हणून या. 🔴14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही, नालायका, गधडा वगैर सारखे शब्द वापरून नये. 🔴15. मुलांना ...