पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. By-Nilesh Konde-Deshmukh. जेल:- विना पैशाचे वसतीगृह चिंता :- वजन कमी करण्याचे                   सर्वात स्वस्त औषध. मृत्यू :- पासपोर्ट शिवाय पृथ्वी                   सोडून जाण्याची सुट. कुलुप :- बिनपगारी वॉचमन कोंबडा :- खेड्यातील अलार्म                               घडी भांडण :- वकीलाचा कमावता                                पुत्र. स्वप्न :- फुकटचा चित्रपट. दवाखाना :- रोग्यांचे संग्रहालय. स्मशान भूमी :- जगाचे शेवटचे                                 स्टेशन. देव :- कधीच न भेटणारा                 महा- व्यवस्थापक. विद्वान :- अकलेचा ठेकेदार. चोर :- रात्री काम करणारा                   प्रामाणिक व्यापारी. जग :- एक महान धर्मशाळा.                  आयुष्याच्या चित्रपटाला once  more नाही. हव्याहव्याशा वाटणाऱ्या क्षणाला, download करता येत नाही. नकोनकोशा वाटणाऱ्या क्षणाला, delete ही करता येत नाही. कारण हा रोजचा तोच तो असणारा, reality show नाही. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.

भगवान श्रीकृष्णाने सांगितल्या अशा 5 वस्तू, ज्या घरात असल्याने नेहमीच धन, संपत्ती, आनंद आणि समृद्धी वाढते. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
‼️भगवान श्रीकृष्णाने सांगितल्या अशा 5 वस्तू, ज्या घरात असल्याने नेहमीच धन, संपत्ती, आनंद आणि समृद्धी वाढते‼️ जेव्हा महाभारतच्या युद्धात श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पांडव आपल्या संपूर्ण कुटुंबा समवेत हस्तिनापूरला परत आले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाराज धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पण परत आल्यामुळे कौरव खूश नव्हते. पांडवांना ठार मारण्यासाठी कौरवांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते पण ते यशस्वी झाले नाहीत. पांडव आणि कौरवांपैकी सर्वात ज्येष्ठ व कुशल असल्याने आणि लोकांची मागणी पाहून युधिष्ठिर राजा झाला. ज्या दिवशी युधिष्ठरचे राजटिळक केले, त्याच दिवशी श्रीकृष्ण आशीर्वाद देण्यासाठी देखील पोहचले. राजटिळकाच्या रात्री युधिष्ठिर व श्रीकृष्ण राज्यात सुख आणि शांती कशी स्थापित करावी या चर्चेत श्रीकृष्णाने युधिष्ठिरला अशा पाच गोष्टी सांगितल्या ज्या घरात असने खूप शुभ असते. या पाच गोष्टी घरात असल्याने नेहमीच धन, संपत्ती, आनंद आणि समृद्धी राहते. तर मग त्या पाच वस्तूंची नावे व त्यांच्या विषयी तपशील जाणू या पाणी : सर्वात पहिले बोलायचं झाले तर ती पहिली वस्तू

प्रदक्षिणातील भाव आणि अर्थ. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
प्रदक्षिणा. देवाला भावपुर्ण नमस्कार केलेला आहे. डोळेभरून त्याचे लोभस रूप मनात साठवले आहे.  आता प्रदक्षिणा मारायची. म्हणजे काय करायचे. सगळे करतात म्हणून करायचे का? कारण बर्‍याच जणांच्या तोंडून ऐकलेला शब्द. चला चकरा मारू. गोल फीरू. पण प्रदक्षिणेचा अर्थ नीट समजुन घेतला तर. प्रदक्षिणा म्हणजे देवाला नीट न्याहाळणे. चहुबाजुंनी त्याला बघत बघत मी माझी पावलं टाकणे. आपण प्रदक्षिणा करतांना एक मंत्र म्हणतो. यानि कानिच पापानि, जन्मांतर कृतानीच, तानी तानी विनश्यन्तु प्रदक्षिणे पदेपदे. पादुकापुजन झाल्यावर ह्या मंत्रासहित स्वत:भोवती आपण तीन प्रदक्षिणा हा मंत्र म्हणत घालतो त्यामुळे हा मंत्र परिचयाचाच आहे.  ह्याचा अर्थ ह्या किंवा त्या कारणाने माझ्याकडुन, कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील, त्या प्रत्येक चुकांचा/ पापांचा, ह्या प्रदक्षिणेद्वारे पडणार्‍या प्रत्येक पावला गणिक, नाश होऊ दे. म्हणुन स्वत:भोवतीची प्रदक्षिणा अजुनच सावकाश घालायची असते.  माझा देव मधे बसलेला आहे. तो माझ्या कडे बघतो आहे. मीहि त्याच्या कडे प्रेमाने पहात हि प्रदक्षिणा पुर्ण करतो आहे..हा शुध्द भाव जागृत असायला हवा. तरच त्या

गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
गायत्री  मंत्र  सर्वाक्षर  महिमा *''ॐ''*   या  अक्षराचा  उच्चार  केला  असता  मस्तकातील  भाग  प्रभावित  होतो.   *''भू:''*   या  अक्षराच्या  उच्चाराने  उजव्या  डोळयावरील  चार बोटांचा  कपाळाचा  भाग  जागृत   होतो. *''भूव:''*  च्या  उच्चारणाने  मानवाच्या  भृकुटीच्या  वरील  तीन  अंगुलीचा  भाग  प्रभावित  होतो. *''स्व:''*   या  अक्षराच्या  उच्चाराने  डाव्या  डोळयावरील  कपाळाचा  चार  अंगुली  इतका  भाग  जागृत   होतो. *''तत्''*  च्या  उच्चाराने  आज्ञा  चक्रामध्ये  असलेली  'तापिनी'  ग्रंथीतील  सूप्त  असलेली  'साफल्य'  शक्ति   जागृत   होते. *''स''*  च्या  उच्चाराने  डाव्या  डोळयातील  सफलता  नांवाच्या  ग्रंथीमध्ये  सुप्त  रूपाने  असलेली  'पराक्रम'  शक्ति  प्रभावित  होते. *''वि''*  चे  उच्चारण  केले  असता  डाव्या  डोळयामधील  'विश्व'  ग्रंथीमध्ये  स्थित  असलेली  'पालन'  शक्ति   जागृत   होते. *''तु''*  या  अक्षराच्या  उच्चा

बाबासाहेबांचे वारकरी संप्रदायातील संतावरील प्रेम. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
स्वत: आंबेडकरांना भारतीय उपखंडांतील चालिरीती, धर्म संकल्पना, संस्कृती या बद्दल संपूर्ण आणि सम्यक भान होते. त्यांनी पहिले वृत्तपत्र पाक्षिक ‘मुकनायक’ 31 जानेवारी 1920 ला सुरू केले. या पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात बोधवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे. काय करू आता धरूनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ॥ नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण ।  सार्थक  लाजून नव्हे हीत ॥ तुकाराम महाराजांचा अभंग वापरायचे कारण त्यांना वारकरी संप्रदाय आणि त्याचा प्रभाव याची पूर्ण जाणीव होती. जनसामान्यांच्या प्रबोधनाचे काम करावयाचे तर त्यासाठी त्यांना समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे. त्या काळात आणि खरं तर आजही तळागाळात वारकरी संप्रदायाने एक अध्यात्मिक सामाजिक परिभाषा रूजवली. आपल्या मुक राहिलेल्या सामाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी आपण नायक बनलोच पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येक सामान्य मुक जन हा ‘मुकनायक’ बनला पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होते. आणि त्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला. अभंगाच्या पुढच्या ओळी ज्या त्यांनी प्रत्यक्ष वापरल्या नाहीत पण त्यातूनही बाबासाहेबांचा दृष्टीकोन काय आहे हे

नऊ संख्या आणि नवरात्र By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व. 🌺 नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी. 🔶 दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री. 🔶 दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका. 🌺 महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई),  श्री एकवीरादेवी (कार्ला). 🌺 नवरात्रींचे ‘नऊ’ रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा. 🌺 नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश. 🌺 नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी. 🌺 ‘नऊ’ प्रकारची दानं अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञ

हिंदू लग्न पध्दती. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
  १) लग्नात मांडव कशासाठी ??? = मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!! २) विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी??? = माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!! ३) नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी??? = माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!! ४) मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी??? = मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!! ५) लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी??? = प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही  हे सांगण्यासाठी !!! ६) लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी??? = तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी ! ७) लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी??? = तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे बालपण माहेरी असते त्

सुभाषित By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
सुभाषित अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा च पृष्ठके। स्वकार्यमुद्धरेत्प्राज्ञः कार्यध्वंसो हि मूर्खता॥ अर्थ :  मानसन्मान मिळेल किंवा नाही याकडे दुर्लक्ष करून, अपमान झाला तरिही त्याला स्विकारण्याची तयारी ठेऊन बुद्धिमान व्यक्तिने स्वतःचे कार्य साकार करून घेतले पाहिजे. कारण की मानवाची हुशारी किंवा मूर्खता आदर किंवा अपमान मिळविण्यात नाही तर कार्य साकार करून घेण्यांत हुशारी आहे आणि कार्याचा नाश करण्यात तर त्याची मूर्खता आहे.

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरी. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. उदय-अस्ताचे प्रमाणे | जैसे न चालता सूर्याचे चालणे | तैसे नैष्कर्म्यत्व जाणे | कर्मींचि असता || सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध  आहे. मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात, शुक्र-शोणिताचा सांधा | मिळता पाचांचा बांधा | वायुतत्व दशधा | एकचि झाले ||    शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.  सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदत

निष्ठेचा एक...नाथ. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
आता काल परवाची गोष्ट. गोष्ट तशी राजकीय परंतु सामाजिक काम करत असताना गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गेली 39 वर्षं सातत्यानं एका पक्षाबरोबर निष्ठावंत राहून आपला आयुष्य वेचणाऱ्या एकनाथ खडसे या व्यक्तिमत्त्वातून निष्ठावंत रेखाटण्याचा केलेला लिखाणाचा हा खटाटोप. सध्या राजकारण एवढ्या खालच्या पातळीला गेलेलं आहे की माणूस आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली सत्ता टिकवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की रियासत की बुनियाद हिलने लग जाये तो खून की जरूरत पड़ती है । परंतु या प्रकरणांमध्येे खून म्हणजे थोडक्यात राजकीय बळी असं समजावं. 39 वर्षांच्याा प्रदीर्घ काळानंतर एकनाथराव खडसे यांनी घड्याळ हातावर बांधल आणि खऱ्या अर्थानंं निष्ठेचा कुठेतरी अस्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  39 वर्षांमध्ये खडसेंना विविध पदही मिळाली मानसन्मान ही मिळाला परंतु जेवढा मानसन्मान मिळाला तेवढा अपमान ही मिळाला आणि दोन्ही बाजू या समांतर झाल्या.  देण घेण हा व्यवहार झाला आणि काही न घेता फक्त देण म्हणजे समर्पित करण म्हणजे निष्ठा. पण ती दोन्ही बाजूंनी सारखीच असली पाहिजे आणि त

मंचकी निद्रा. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
मंचकी निद्रा  श्री तुळजाभवानी देवी वर्षातून ३ वेळा निद्रा घेत असते या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर (पलंगावर) होत असतात ते खालीलप्रमाणे. १) चांदीचा मंचक २) लाकडी मंचक "महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते.उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमेव द्वितीय आहे. देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे. मंचक याचा अर्थ पलंग असा आहे. देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी, १) घोर निद्रा :- नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. ही निद्रा तुळजाभवानी मंदिर संस्थानात असलेल्या चांदीच्या मंचकावर भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या समाप्ती पर्यंत निद्रा असते आणि अश्विन शुद्ध प्रथमा ला