पोस्ट्स

स्वराज्याचे शिलेदार व्यसने करु हद्दपार. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
स्वराज्याचे शिलेदार व्यसनांना करू हद्दपार.- ह.भ.प निलेशमहाराज कोंडे-देशमुख. वारकरी मंच आयोजित व्याख्यानमालेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यास...

नो सांता By- Nilesh Konde-Deshmukh

आमच्या शिखांच्या परंपरेत एका संताने आपल्या जिवलग मित्र बंता सोबत ( संता सिंह बेअंत सिंह ) अतुलनीय पराक्रम दाखवून नादिरशहा आणि अहमदशहा अब्दाली या दोन अफगाणी लुटारूच्यां...

अंघोळ केंव्हा करु नये. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
|| अंघोळ केंव्हा करू नये. अंघोळीचे वेळापत्रक || स्ना न म्हणजे शरिराची शुद्धि करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये जितके महत्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्व हे स्नानाला आहे. अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे. 🚿 ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे 4 ते 6. मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8. राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10. प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12. त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड. ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ. ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते. 6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते. ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्या सारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उ...

वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या Online परिक्षेत सहभागी व्हावे तरुणाईला आवाहन. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या Online परिक्षेत सहभागी व्हावे तरुणाईला आवाहन - समन्वयक  (पिंपरी चिंचवड) ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.  शांतिब्रम्ह एकनाथ महाराज मिशन (पैठण) संचलित Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सकल संतांची चरित्रे आपणास वाचण्यास मिळणार आहे. संतांच्या चरित्राच्या माध्यमातून आपणास ज्ञान तर मिळणारच आहे. या शिवाय आनंद ही मिळणार आहे. यासाठी आपल्याला कोठे ही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या स्मार्ट फोन च्या माध्यमातून हा अभ्यासक्रम आपण ही Online पध्दतीने पुर्ण करु शकता. यातुन आपला बहुमूल्य वेळ वाचवुन आपण आहे त्या ठिकाणाहुन हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. या अभ्यासक्रमात कोणत्याही जाती धर्म पंथ वर्ण चा संत वाड्मंयाची आवड असलेला मनुष्य सहभागी होवू शकतो. खालील लिंक वर जाऊन आजच प्रवेश घ्यावा. http://santeknath.org/eknath/index.php अधिक माहितीसाठी संपर्क. 9960355522/8805010791 तरूणाईने संत विचारांच्या सानिध्यात येण्याची खय्रा अर्थाने गरज असल्या कारणाने......! तरूणांना मी आवाहन करतो की आपला बहुमूल्य वेळ हा योग्य मार्गी लावण्यासाठी आपल्या जवळील स...

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
अभिष्टचिंतन. 24 एप्रिल हा कामगार नेते श्री संतोष (अण्णा) बेंद्रे साहेब यांचा जन्मदिवस. खरं तर कामगार क्षेत्राला आत्तापर्यंत अनेक विचारवंतांचे आणि निडरपणे काम करणाऱ्या कामगार नेत्यांचे नेतृत्व लाभलेले आहे. परंतु जेवढे कामगार नेते होऊन गेले या कामगार नेत्यांनी आपली दुसरी फळी म्हणजे आपल्या नंतर हा वारसा दुसऱ्या पिढीकडे नेतृत्वाचा जाऊन दिला नसल्यामुळे आणि राजकीय हव्यासापोटी कामगार क्षेत्राचा बाजार मांडला गेल्यामुळे अल्पावधी काळामध्ये कामगार क्षेत्र हे लयास मिळायला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कामगार नेत्यांनी आज पर्यंत फक्त कार्यकर्ते घडवले परंतु कामगार क्षेत्रामधून एखादा कामगार नेता घडत आलेला नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. एका ठिकाणी काही वयस्कर लोक शेतामध्ये धान्य पेरत होती त्यावेळी बाल वयात असलेल्या भगतसिंग ने ही पेरणी चालू असताना एका वयस्कर माणसाला विचारलं की तुम्ही काय करत आहात. त्यावर तो वयस्कर माणूस म्हणाला आम्ही धान्य पेरत आहे. हे धान्य जमिनीमध्ये पेरल्यानंतर माझ्याकडं असे भरपूर धान्य तयार होईल आणि मी उपाशी लोकांची भूक भागू शकेल हे वाक्य कानी...

व्यसनाची संगत संपवी आयुष्याची रंगत. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
व्यसनांबाबत कितीही प्रबोधन झाले तरीही याला तरुणाईची मस्ती दाद देत नाही, असेच म्हणावे लागेल. मात्र एखादा विषय जोपर्यंत डोक्यात शिरत नाही तोपर्यंत तो सातत्याने डोळ्यासमोर लादला गेला पाहिजे. म्हणुन प्रबोधन होणे गरजेचे आहे. सरकार एकीकडे व्यसनमुक्तीचा प्रचार करत आहे तर दुसरीकडे मात्र दारू सिगरेट तंबाखू यांचे कारखाने उभारण्यासाठी परवानगी देत आहे. सरकारच्या या दुप्पटी धोरणामुळे दिवसा गणित व्यसनाधीन तरुण-तरुणींची संख्या वाढत चाललेले आपल्याला दिसत आहे. आता मंग व्यसनाधीनतेचा हा वेगानं होणारा प्रादुर्भाव रोखायचा कसा? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एकच प्रबोधन. प्रबोधनाच्या माध्यमातून आपण जे तरुण-तरुणी व्यसनांमध्ये पडणार आहे यांना नशेपासून रोखू शकतो आणि हे नव्याने व्यसन करायला लागलेले आहे त्यांना आपण समुपदेशनाने व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढू शकतो. जवळपास 80 टक्के आपण प्रबोधनाच्या माध्यमातून आणि 20 टक्के उपचाराच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो. व्यसनमुक्ती काळाची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरच समाजाची व देशाची प्रगती होईल असे मला वाटते. सह...

पारंपरिक होळी सोबतच व्यसनांची होळी साजरी करावी तरूणाईला वारकरी मंच कडुन आवाहन.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.

इमेज
पारंपरिक होळी सोबतच व्यसनांची होळी साजरी करावी असे तरुणाईला आवाहन.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर. व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक हानी होत असते. यामुळे अनेक कुटूंबेही उध्वस्त झाली आहेत. यामुळे गुन्हे, घात-अपघांतामध्येही वाढ झालेली असतानाही नागरीक त्यात गुरफटत असल्याने त्यापासून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून वारकरी मंचाच्या वतीने व्यसनांची होळी करण्यात यावी असे आवाहन तरूणाईला करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी त्यांना जडलेले व्यसन एका कोऱ्या कागदावर लिहून त्याचे होळीत दहन केले पाहिजे, जे निर्व्यसनी आहेत त्यांनी होळीमध्ये कोरे कागद टाकून व्यसनांपासून दूर असल्याचे सांगुन होळीच्या अग्निला साक्षी ठेवून मी आजच्या दिवसापासून कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही, अशी शपथ घेतली पाहिजे. वारकरी मंच महाराष्ट्र राज्य राबवत असलेल्या व्यसन मुक्ती अभियानाचा पहिला टप्पा जनजागृती या विषयावर बोलताना ही भावना अभियान प्रमुख ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर यांनी व्यक्त केली.

व्यसनाधीनता राष्ट्र हितासाठी मारक.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
व्यसनाधीनता राष्ट्र हितासाठी मारक- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख. सध्या जगामध्ये मृत्युच्या कारणांमध्ये व्यसन हे चौथ्या क्रमांकावर आहे.जगभरात दरवर्षी ८ ते १० लाख लोक फक्त तंबाकूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात. जवळपास १६ करोड तरुण वर्ग दारुच्या आहारी गेलेला आहे. आजकाल पुरुष व तरुणांबरोबरच स्त्रिया व मुले यांच्यामध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यसनांच्या पदार्थांमध्ये मुख्यतः गुठखा, तंबाखू, दारू तसेच चरस,गांजा,अफू,झोपेच्या गोळ्या किंवा इतर मादक पदार्थ असू शकतात.अलीकडेच इंटरनेट व स्मार्टफोनचीही व्यसनाधीनता होऊ शकते असे म्हटले जातेय. भारतात व्यसनामुळे युवा पिढी वाया जात आहे. व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त होण्याकडे आजच्या तरुणांचा कल नाही. आजचा युवक हा देशाचे भविष्य आहे. मात्र व्यसनाधीन युवा वर्ग देश कसा सांभाळणार, असा प्रश्न पडतो. व्यसनाधीनता आणि युवा पिढी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न. व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. कोणतीही व्य...

छत्रपतींची ललकारी. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
छत्रपतींची ललकारी. महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तीला मराठीत गारद म्हणतात ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला अल्काब तर संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली म्हणले जाते छत्रपती शिवरायांची अल्काब व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात #दुर्गपती - गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य (राज्य) आहे असे #गज_अश्वपती - असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो #भूपती_प्रजापती - वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे #सुवर्णरत्नश्रीपती - नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे शिवरायांच्या बाबती ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती #अष्टावधानजागृत - आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा ) #अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात न...

धन्यवाद साप्ताहिक शिव पर्व.

इमेज
SPप्रतिनीधी:१२ मार्च: वारकरी मंच महाराष्ट्र राज्य चालवत असलेल्या व्यसन मुक्ती अभियानाचा जनजागृती हा पहिला टप्पा गावपातळीवर राबवण्यात येणार असुन मार्च अखेरपर्यंत गावोगावी जाऊन व्यसनाचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक दुष्परिणाम या बाबतीत मी स्वता प्रबोधन करणार आहे अशी माहिती ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख यांनी साप्ताहिक शिव पर्व च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख पुढे म्हणाले की तरूणाईला व्यसनांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावपातळीवर हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे या अभियानात तरूण तरूणी ही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. पुढे ते म्हणाले की व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. जो पर्यंत एखादे गाव व्यसन मुक्त होणार नाही तो पर्यंत त्या गावाची प्रगती व परिणामी राष्ट्राची ही प्रगती होणार नाही. व्यसन हे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करणार तर आहेच परंतु कुटुंबासोबत राष्ट्र हितासाठी देखील मारक आहे. या साठीच व्यसन मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय वारकरी मंचाने घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिव पर्व शी ब...