तुकोबांनी देव म्हणजे काय हे सांगितले आहे. By-Nilesh Konde-Deshmukh.
तुकोबांनी देव म्हणजे काय हे सांगितले आहे. By-Nilesh Konde-Deshmukh. तुकोबा म्हणतात, देव आहे देव आहे । जवळी आह्मां अंतरबाहे ।। यात तुकोबांनी देव आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला होता आणि तो कुठे आहे या विषयी काही संदेहही उरू दिला नव्हता. त्यांनी त्या दिवशी विवरूनही सांगितले होते की – देव आम्हां जवळी आहे! अंतरबाहे जवळी आहे! देव अंतरी आहे, देव बाहेरही आहे. अंतरात आहे तो देव आहे, बाहेर आहे तो ही देव आहे. गोडीपणे जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ।। आता भजो कवणे परी । देव सबाह्य अंतरी ।। उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ।। हेम अळंकारा नामी । तुका ह्मणे तैसे आम्ही ।। यात तुकोबांनी प्रतिमा वापरून विषय अजून सोपा केलाय. गुळ आणि गोडी, पाणी आणि त्यावरील तरंग, सोन्याचे अलंकार आणि सोने ह्यांत वेगळे काही काढता येईल का असे विचारून ते म्हणतात तसाच देव सबाह्य अंतरी म्हणजेच सर्वत्र आहे. तो वेगळा काढून दाखविता येणार नाही.” तुकोबा म्हणतात सोन्याचा जसा छानसा अलंकार होतो तसे त्या जीवाचे म्हणजेच देवाचे आपण बनलेले आहोत. आपल्यापासून देव वेगळा काढता येणारच नाही. इतकेच नव्हे तर पाहा, ते ह्या अभंगात म्हणतात, जेव्हा माझ...